
जसे पावसाला गणगोत नाही
बेधुंद घनघोर बरसत तो राही
तसे या मनाला उधळून द्यावे
नव्याने पुन्हा रोज प्रेमा पडावे…
जसे थेंब अंगावरी हे फवारे
भिडे गारवा अंगी उठती शहारे
तसे या मनाला पसरूनी द्यावे
नव्याने पुन्हा रोज प्रेमा पडावे…
जशी दरवळे माती ओली सुंगधी
आनंदात या सर्व रमे आत्मरंगी
तसे या मनाला सुगंधी करावे
नव्याने पुन्हा रोज प्रेमा पडावे…
जसे तृप्त होती ही धरती शिवारे
पिसारे फुलवून मोर स्वच्छंद नाचे
तसे मनाला मोकळे त्या करावे
नव्याने पुन्हा रोज प्रेमा पडावे….
– सौरभ